Ticker

6/recent/ticker-posts

आता महिलांना दीड हजार नव्हे 3000 मिळणार! राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा

आता महिलांना दीड हजार नव्हे 3000 मिळणार!


राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा

दरारा 24 तास न्युज नेटवर्क

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिलांना महालक्ष्मी योजनेतून दरमहा 3 हजार रुपये देणार आणि मोफत एसटी प्रवासाचा निर्णय घेणार असं राहुल गांधी म्हणाले.

मुंबई : महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीपैकी एका गॅरंटीबद्दल माहिती देणार असल्याची माहिती राहुल गांधी यांनी दिली. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे इतर गॅरंटीबद्दल सागंतील.मी तुम्हाला महालक्ष्मी योजनेबाबत माहिती देणार आहे. प्रत्येक महिलेच्या खात्यात 3 हजार रुपये प्रत्येक महिन्याला इंडिया आघाडीचं सरकार पाठवेल. महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये थेट खटाखट खटाखट खटाखट खटाखट खटाखट पाठवणार आहोत. महाराष्ट्रातील महिला बसमधून प्रवास करतील तेव्हा त्यांना बस तिकीट खरेदी करण्यासाठी एक रुपया द्यावा लागणार नाही. त्यांना मोफत प्रवास करता येईल. 

भाजपच्या सरकारनं महागाईचा त्रास, गॅस सिलिंडरच्या दराचा त्रास, बेरोजगारीचा त्रास सर्वाधिक महिलांना होतो. त्यामुळं महाराष्ट्राच्या महिलांच्या खात्यात थेट तीन हजार रुपये पाठवणार आणि राज्यात सर्वत्र मोफत प्रवास या गॅरंटी देणार असल्याचं राहुल गांधी म्हणाले. 

नागपूरमध्ये एका संमेलनात जातनिहाय जनगणनेवर चर्चा केली. भारतात दलित लोकसंख्या 15 टक्के आहे. 8 टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. मात्र, आजपर्यंत या देशात मागासवर्गाचे किती लोक आहेत हे माहिती नाही. कोणी म्हणत 50 टक्के, 55 टक्के कोणी म्हणत 60 टक्के आहे. कुणालाच माहिती नाही. 

जेव्हा आम्ही भारताच्या संस्था, माध्यमं , कॉर्पोरेटला पाहतो , न्यायव्यवस्था पाहतो तेव्हा तिथं त्या संस्थांमध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक आणि खुल्या प्रवर्गातील गरीब लोक दिसत नाहीत. त्यामुळं आम्हाला देशात एक ऐतिहासिक पाऊल ऊचलावं लागेल. देशात जातनिहाय जनगणना करावी लागेल. पॉवर स्ट्रक्चरमध्ये कुणाची किती भागिदारी असेल, पैसा कुणाच्या हातात आहे, संस्था कुाच्या हातात आहे. लोकसभा निवडणुकीत सांगितलं होतं की आमचं सरकार बनल्यास जातिनिहाय जनगणना करु असं सांगितलं होतं. कर्नाटक आणि तेलंगणात जातनिहाय जनगणनेचं काम सुरु केलं आहे. तेलंगणातील सर्व्हेतील प्रश्न जनतेनं ठरवलेले आहेत,असं राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्रात सरकार आल्यास जातनिहाय जनगणनेचं काम सुरु करणार आहोत. 

केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा जातनिहाय जनगणना होईल. आरक्षणाला लावण्यात आलेली 50 टक्क्यांची मर्यादा काढून टाकू असं राहुल गांधी यांनी सांगितलं. संविधान संपल्यास भारतातील गरीब लोकांजवळ, आदिवासी लोकांजवळ काही राहणार नाही. जे शिक्षण, आरोग्य, जमिनीचं संरक्षण संविधान करतं. अदानींना काही प्रमाणात रोखण्यात आलंय ते संविधानामुळं रोखण्यात आलंय, असं राहुल गांधी म्हणाले. सर्व महापुरुषांचा आवाज संविधानात आहे, गरिबांचा, शेतकऱ्यांचा आवाज संविधानात आहे, असं राहुल गांधी म्हणाले. काही झालं तरी संविधानाला कोणी हात लावू शकत नाही, संविधानाला संपवू देणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. 

आमदार खरेदी करुन तुमचं सरकार पाडलं गेलं. आता तुमचं सरकार बनवा, जे तुमचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात पाठवणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. 

साभार ABP live

Post a Comment

0 Comments