Ticker

6/recent/ticker-posts

भोकर तालुक्यात अतिवृष्टी ग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी प्राप्त झाले 52 कोटी 43 लाख रुपयाचे अनुदान

 




  1. भोकर (तालुका प्रतिनिधी) चालू वर्षाच्या खरीप हंगामात पावसाने प्रचंड प्रमाणात पिकांचे नुकसान झाले, पूर्ण शेती जलमय झाली, अतिवृष्टीने बाधित 45 हजार 460 शेतकऱ्यांना 38 हजार 552 हेक्टर शेतातील नुकसानीसाठी 52 कोटी 43 लाख रुपये शासनाचे अनुदान प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिली.
  2.        भोकर तालुक्यात जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये संततधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आले शेती व शेतातील पिकेही वाहून गेले, शेती जलमय झाल्यामुळे त्यामधील कापूस, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग हाती लागले नाही, शेतकऱ्यांना मोठे आर्थिक संकट ओढवले, शेतातील पीक जमिनीच्या वर येत असतानाच पावसाने कहर केला ऑगस्ट महिन्यामध्येच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. आधीच शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करावे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून कडून करण्यात आल्याने शासनाने बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे करून अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार महसूल विभागाने तालुक्यातील बाधित शेतीचा अहवाल पाठविला होता.
  3. *भोकर तालुक्यासाठी 52 कोटी 43लाख रु.अनुदान प्राप्त
  4. *******************************************†**
  5. भोकर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले 38 हजार 552 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते 45 हजार 460 शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले शासनाकडून बाधित जमिनीच्या अनुदानापोटी 52 कोटी 43 लाख रुपये तालुक्याला प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार राजेश लांडगे यांनी 23 सप्टेंबर रोजी बैठकीत बोलताना दिली, शेतकऱ्यांच्या खात्यावर सदर रक्कम जमा करण्याचे काम चालू असून येत्या काही दिवसातच नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्यानंतर काही दिवसात वाटप सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री किसान योजनेसाठी ई केवायसी शेतकऱ्यांनी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

Post a Comment

0 Comments