जिवती: शासकीय आश्रम शाळा येथे इंग्लिश स्पिकिंग क्लब उपक्रमाची सुरूवात,भविष्य वेधी शिक्षण प्रणाली नुसार शासकीय शाळेत विविध उपक्रम सुरू असून जिवती आश्रम शाळेत उमेश राठोड मुख्याध्यापक यांनी मुलांना इंग्रजी बोलता यावे,करिता हा उपक्रम सुरू केला.असून दर शनिवारी शाळेचे मुलं या उपक्रमात भाग घेतात, ह्या शनिवारला कुकिंग रेसिपी इन इंग्लिश हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला .विद्यार्थ्यांनी मेकिंग टी, आलू पराठा आम्लेट , इ,रेसिपी तयार करून इंग्रजीतून वर्णन करुन दाखविले ,त्यांना मार्गदर्शक म्हणून पारधी,पवार ,राठोड ,खडतकर, चुणारकर, खाडे, खैरे,बिरादार ह्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.मुख्याध्यापक उमेश राठोड यांनी मुलांना बक्षिसे दिली. मा.सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे चंद्रपूर यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले आहे.
0 Comments