Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूरात तीन मजली इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही! आ. किशोर जोरगेवारांची घटनास्थळाला भेट!

चंद्रपूर - स्थानिक घुटकाळा वार्डातील जिर्ण अवस्थेत असलेली इमारत कोसळल्याची घटना आज दुपारी दिड वाजताच्या सुमारास घडली. सदरहु घटनेत शाहिस्ता खान नामक महिला मल्याम्याखाली दबल्या गेली होती. या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच यावेळी मलब्याखाली दबलेल्या महिलेला वैद्यकीय मदत करण्याच्या सुचना अधिकारी वर्गांना त्यांनी केल्या.तसेच आ.जोरगेवार यांनी पिडीत कुटूंबाला आर्थिक मदत केली.
 चंद्रपूर शहरात घुटकाळा वार्डात पटेल नामक तिन मजली इमारत आहे. सदरहु इमारतीचे बांधकाम जुने असल्याने इमारत जिर्ण झाली होती. या इमारतीत शेख कुटुंबीय वास्तव्यास आहे. मात्र आज दुपारच्या दरम्यान इमारत खाली कोसळली या घटनेत शाहिस्ता खान नामक महिला इमारतीच्या मलब्या खाली दबल्या गेली. घटनेची माहिती मिळताच आमदार जोरगेवार यांनी घटनास्थळ गाठले. तेव्हा महिलेला बाहेर काढण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या वतीने सुरु होते. काही वेळात महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात आले. सदरहु महिलेला शक्य ती वैद्यकीय मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सुचना आमदार जोरगेवार यांनी संबधित अधिका-यांना केल्या असुन पिडीत कुटुंबाला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आर्थिक मदत केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या अल्प संख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments