Ticker

6/recent/ticker-posts



राजुरा :- विधानसभा क्षेत्रात गोंडवाना गणतंत्र पार्टीने चांगली कामगिरी करत 20 ग्रामपंचायतीवर गोंडवाना गणतंत्र पार्टीने आपला झेंडा फडकवला आहे. जवळपास 20 ग्रामपंचायत निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीने पहिल्यांदाच मोठी आघाडी घेतली आहे.

राजुरा तालुक्यातील इसापूर - वरझडी, मानोली खुर्द, मांगी बू., अहेरी, सिर्सी बेरडी, भेंडाळा - नवेगाव, कावडगोंदी तर जिवती तालुक्यातील भारी, चिखली पाटण, आसापूर, खडकी रायपूर, माराई पाटण, धोंडाअर्जुनी, पुनागुडा (युती), येरमी येसापूर, राहपल्ली खुर्द (युती) सोरेकसा, कोरपना तालुक्यातील नांदा (युती), पिपर्डा आणि बेलगाव ग्रामपंचायतीवर गोंडवाना गणतंत्र पार्टीने झेंडा फडकवला.

ही निवडणूक गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते गजानन पाटील जुमनाके, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, नगरसेविका तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सतलूबाई जुमनाके, माजी जिल्हाध्यक्ष बापूराव मडावी, जिल्हाउपाध्यक्ष माजी सभापती भीमराव मेश्राम, माजी जिल्हा परिषद सदस्य निशिकांत सोनकांबळे, प्रदेश प्रवक्ते महेबूब शेख जेष्ठ नेते तथा नगरसेवक ममताजी जाधव यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवण्यात आली.

राजुरा विधानसभा क्षेत्रातील 84 ग्रामपंचायती मध्ये जवळपास 90 ग्रामपंचायत सदस्य गोंडवाना गणतंत्र पार्टीचे निवडून आले. विशेषतः गोंडवाना गणतंत्र पार्टी पहिल्यांदाच राजुरा विधानसभा क्षेत्रात ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली आणि चांगली कामागिरी करत 20 ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन करत जवळपास 90 ग्रामपंचायत सदस्य निवडून आणत आपली ताकद दाखवली.

नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांचे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते गजानन पाटील जुमनाके यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments