Ticker

6/recent/ticker-posts

शहिद विर बाबुराव शेडमाके यांच्या क्रांतीची मशाल धगधगती करा - रुपेश निमसरकार




▪️ॲाल इंडिया पँथर सेने तर्फे स्मृतीस अभिवादन

चंद्रपूर : १८५७ चे स्वातंत्र्यवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके ज्यांनी चंद्रपुर- गढचिरोली भागातील सावकार , तथा इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. गडचिरोली व चंद्रपुर येथील गोंड , तथा इतर गैर गोंडियन समाजास सावरकरांच्या जाचातून त्यांच्या हूकूमशाही व अत्याचारातून सुटका करून देण्या करिता वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी प्रत्येक समाजातील तरून युवकांना सोबत घेऊन जंगोम सेना तयार केली व सावकार , आणी इंग्रजांच्या विरूद्ध लढाई सुरू केली. बाबुरावांना व जंगोम सेनेला भरपुर यश मिळाले होते. सावकारांच्या मुसक्या बांधल्या आणी इंग्रजांना तर सळो की पळो करून इंग्रज सैन्याला व इंग्रज कॅप्टन अधिका-यांना कापून टाकून त्यांचा फडशा पाडला होता. इंग्रजांच्या नाकी नऊ आणले. त्यामुळे इंग्रजांनी नाना विविध प्रकारचे प्रयत्न करुन बाबुरावांना पकडण्याचा व त्यांना खत्म करण्याचा डाव रचला परंतू विर बाबुराव अत्यंत चतुर व हुशार असल्या मुळे इंग्रजांचे सर्व डावपेच हानून पाडले. इंग्रजांचा वारंवार पराभव , खुन , त्यांचे कार्यालय, छावण्या उध्वस्त करने सुरूच ठेवले त्यामुळे इंग्रज चांगलेच घाबरले होते. 


           पण शेवटी इंग्रजांनी कुटनिती वापरली व राणी लक्ष्मी बाई शेडमाके बाबुरावांच्या काकू यांना राज गादी व सर्व साम्राज्याची भेट देण्याची ऑफर दिली व बाबुरावांना पकडण्यासाठी अशा स्वार्थी बाईंची निवड केली. जी स्वता त्या शेडमाके परिवारातील होत्या. व तो दिवस आला आणी बाबुरावांना राणी लक्ष्मी बाई च्या घरी जेवतांना पकडले. आणी चांदागढ जिल्ह्याच्या कारागृहामधे एकदा सोडूनदिली.दा फशी दिली पण बाबुराव काही मरेना शेवटी दुसरी निती वापरून बाबुरावांना फाशिची शिक्षा दिली व बाबुराव सेडमाके या सुर्याचा अस्त २१ ऑक्टोबर १८५७ साली झाला. पण जाता जाता प्रत्येक देशवासियांच्या मनात देश स्वातंत्र्य करण्याची आग लावून गेले. 
         अशा विर बहाद्दराचा आज शहिद दिवस त्यानिमित्तानं ॲाल इंडिया पँथर सेना चंद्रपूर च्या वतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, उपाध्यक्ष त्यागीभाई, संगीता येरमे, अतुल भडके, विक्की थोरात आदी पँथर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments