Ticker

6/recent/ticker-posts

होलसेलमध्ये बोगस पीएचडी विकणाऱ्याचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार



दरारा24
केवळ भारतातच नव्हे तर देशविदेशातही पुणे शहराचे नाव प्रसिद्ध आहे. शिक्षणाची 'पंढरी' म्हणून या शहराकडे मोठ्या आदराने बघितले जाते. मात्र याच विद्यानगरीत सध्या अवैध पीएचडी विकण्याचा गोरखधंदा चालू आहे व यातील एका सूत्रधाराचा सत्कार समारंभही चक्क केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला,अशी धक्कदायक बाब ' निदर्शनास आलेली आहे.  

पुणे येथील पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या माधुरी सतीश मिसाळ निवडून आल्या. मात्र याच माधुरी मिसाळ यांच्या कन्येने चक्क पैसे देवून ऑनररी पीएचडी विकत घेतली व मोठ्या अभिमानाने स्वतःच्या नावापुढे डॉ. पूजा सतीश मिसाळ म्हणून मिरवायला सुरुवात केलेली आहे. याविषयीचा पर्दाफाश 'स्प्राऊट्स' या विश्वासार्ह इंग्रजी दैनिकाने २ सप्टेंबर रोजी केला.

पूजा सतीश मिसाळ व त्यांच्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अशा पद्धतीने बोगस पीएचडी विकत घेतलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांना ही पीएचडी 'कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ( टोंगा )' या कथित युनिव्हर्सिटीने दिलेली आहे. तिला युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची ( युजीसी'ची ) कुठल्याही प्रकारची मान्यता नाही. या बोगस विद्यापीठाचा कथित संस्थापक सदस्य राकेश मित्तल यावर याआधीही एफआयआर झालेले आहेत व त्याविषयी टाइम्स समूहाच्या 'पुणे टाइम्स मिरर'ने ३० सप्टेंबर २०१९ रोजी व त्यानंतरही बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. याच वृत्तपत्राने आर्थिक मोबदला घेवून मित्तल यांचा नुकताच सत्कार केलेला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे आयोजक व या गोरखधंदयातील त्यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभार्थी व सूत्रधारांवर भारतीय दंड विधानामधील कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, १०१, १२० (बी) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी 'स्प्राऊट्स'च्या इन्व्हेस्टीगेशन टीमने केली आहे.  

राजभवन बनले होलसेलमध्ये पुरस्कार वाटपाचे केंद्र 

सध्या जवळपास सर्वच वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल्स पैसे घेवून पुरस्कार वाटप करण्याचे कार्यक्रम आयोजित करतात. मुंबईतील राजभवन येथे अशाच प्रकारे अट्टल गुन्हेगार, बोगस पीएचडीधारक लोकांनाही पुरस्कार वाटले जातात. राजभवनाची प्रतिष्ठा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यामुळे धुळीस मिळवलेली आहे. राजभवन हे 'होलसेलमध्ये पुरस्कार वाटपाचे केंद्र' बनले आहे. बहुतांशी वृत्तपत्रे, संस्था येथे पैसे घेवून राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वाटप करतात. 

वाचकांच्या आग्रहास्तव पुन्हा या बोगस विद्यापीठ व बेकायदेशीरपणे पीएचडी वाटप करणाऱ्या संस्थांची यादी प्रसिद्ध करीत आहोत:-

ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, श्रीलंका,
अमेरिका हवाई विद्यापीठ आणि आयनॉक्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठ,
कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, टोंगा,
युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ, अमेरिका,साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी
अमेरिकन युनिव्हर्सिटी, यूएसए,
झोराष्ट्रीयन युनिव्हर्सिटी,
सॉर्बोन युनिव्हर्सिटी, फ्रान्स,
महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन - (NGO)
एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट - (NGO)
नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी - NGO
डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस - NGO
मानव भारती विद्यापीठ (MBU), हिमाचल प्रदेश
मानव भारती विद्यापीठ, सोलन
विनायक मिशन्स, सिंघानिया.
अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस
छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर
अमेरिकन हेरिटेज युनिव्हर्सिटी ऑफ साऊथन कॅलिफोर्निया (AHUSC)
पीस युनिव्हर्सिटी
ट्रिनिटी वर्ल्ड युनिव्हर्सिटी, युके
सेंट मदर टेरेसा युनिव्हर्सिटी
अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल युनिव्हर्सिटी
जीवा थिऑलॉजिकल ओपन युनिव्हर्सिटी
वर्ल्ड पीस इन्स्टिटयूट ऑफ युनायटेड नेशन्स
ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी
भारत व्हर्चुअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशन
नॅशनल ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी
बल्सब्रिज युनिव्हर्सिटी
श्री दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड फिल्म फॉउंडेशन (एनजीओ )
इंटरनॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूमॅनिटी हेल्थ सायन्स अँड पीस, यूएसए
हर्षल युनिव्हर्सिटी
इंटरनॅशनल इंटर्नशिप युनिव्हर्सिटी

जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सहकार्य:उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

Post a Comment

0 Comments