Ticker

6/recent/ticker-posts

ई-पिक पाहणीला 22 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ



 तालुका प्रतिनिधी
    राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत 15 ऑगस्ट 2019 पासून संपूर्ण राज्यात करण्यात येत आहे. सध्या खरीप हंगाम 2022 हंगामाची ईपिक पाहणीची कार्यवाही सुरू आहे.
     खरीप हंगाम 2022 च्या पिक पाहणीच्या नोंदणीसाठी ईपिक पाहणीचे 2.0.3 हे अपडेट वर्जन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून दिले गेले आहे. आतापर्यंत सुमारे एक कोटी 22 लक्ष शेतकऱ्यांनी ईपिक पाहणी भ्रमणध्वनी ऐपवर आपापली नोंदणी केलेली आहे.
     खरीप हंगाम 2022 ची पाहणी प्रत्यक्ष मोबाईल ॲप द्वारे करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2022 ही अंतिम तारीख निश्चित करून देण्यात आली होती. तथापि राज्याच्या काही भागात उशिरा आलेल्या मान्सूनमुळे काही शेतकऱ्यांना अद्यापही आपली ईपिक पाहणी करणे शक्य झाले नाही. या बाबी लक्षात घेता जमाबंदी आयुक्त पुणे यांचे मान्यतेने मोबाईल ॲप द्वारे शेतकरी स्तरावरील ईपीक पाहण्याची काल मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
    त्याचप्रमाणे खरीप हंगाम 2022 च्या शेतकरी स्तरावरील ईपिक पाहणीची कालमर्यादा 22 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता 22 ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांनी मोबाईल ॲप द्वारे पिक पाहणे नोंदणी करून लाभ घ्यावा असे आवाहन श्रीरंग तांबे, उपजिल्हाधिकारी व राज्य सन्मान्वयक, ई- पीक पाहणी प्रकल्प, जमाबंदी कार्यालय पुणे,यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments