मुल तालुक्यातील प्रतिष्ठित व्यापार पेठ बाजारपेठ म्हणून नावारूपास आणि प्रसिद्ध असलेल्या नांदगाव येथील कृषी केंद्राचे सहसंचालक प्रतिष्ठित तरुण व्यापारी मंगेश भाऊ माकोडे यांचे आज दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाची वार्ता नांदगावात येऊन धडकताच नांदगाव शोक सागरात बुडाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यांना उपचारासाठी प्रथमतः चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस तिथे उपचार केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना नागपूर येथे रेफर केले होते. नागपुरात एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सोमवारी मंगेश भाऊ माकोडे यांची प्राणज्योत मालवली.
0 Comments