Ticker

6/recent/ticker-posts

इन्कम टॅक्स फ्रॉड पासून सावधान - ॲड. चैतन्य भंडारी



जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे: सध्या सायबर गुन्हेगारांनी विज बिल पेमंटच्या फसव्या मॅसेजनंतर नागरीकांना आर्थिकदृष्ट्या फसवण्याच्या एक नवीन फंडा सुरु केला आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नावाने नागरीकांना बनावट मॅसेज पाठवण्याचे प्रकार सुरु केले आहे. सदरील मॅसेजमध्ये तुमचे इन्कम टॅक्स भरण्याचे बाकी आहे तुम्ही लवकर लवकरात तो टॅक्स दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तो टॅक्स भरण्यास भाग पाडतात व तो टॅक्स न भरल्यास इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची लिगल टीम तुमच्यावर कारवाई करेल आणि येथेच सामान्य नागरीक फसतात व ते त्या दिलेल्या लिंकवर क्लिक केल्याने किंवा दिलेल्या लिगल टिमच्या नंबरवर कॉल केल्यानंतर आपल्याला सदरचे सायबर गुन्हेगार आपली दिशाभुल करुन आपली खाजगी माहिती विचारून जसे की आपले पिन नंबर, ओटीपी नंबर मागवून आपले बँक खात्याचे डिटेल्स घेवून ते आपल्या बँक खात्यातून परस्पर पैसे ट्रान्सफर करुन घेतात, म्हणून नागरीकांना अॅड. चैतन्य भंडारी यांनी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत की इन्कम टॅक्स व्दारे असे कोणतेही मॅसेज पाठवले जात नाही. सदरील मॅसेज हा बनावट स्वरुपाचा असून सदरच्या मॅसेजमध्ये नागरीकांनी दिलेल्या लिंकवर करु नये तसेच दिलेल्या नंबरवर कॉल करु नये व आपली खाजगी माहिती कोणालाही तसेच कोणत्याही अज्ञात व्यक्तीशी शेअर करु नये, तरी नागरीकांनी याबाबत सावधानता बाळगावी व आपल्यासोबत असे गुन्हे झाले असल्यास टोल फ्री नंबर १९३० वर संपर्क साधावे असे आवाहन अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments