तालुका प्रतिनिधी
तालुक्यात हिंदी वर्तमानपत्रातून वादळी लेखन करणारे व सर्व क्षेत्रात पुढाकार घेऊन समाजहितासाठी अर्थात जन हितासाठी कार्य करणारे एक लढवय्या पत्रकार अधिक अहमद कुरेशी सर यांचे आज रात्री अकरा वाजताची सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाल्याची माहिती आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका येतात उपचारासाठी तात्काळ त्यांना नागपूर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचे पार्थिव नागपूर वरून शहरात आणण्यात आले असून दुपारी दोन वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार होतील अशी माहिती पत्रकार संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिलेली आहे.
त्यांनी नगरपंचायत मध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून यशस्वी पदभार सांभाळला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते विद्यमान संचालक होते. जनता विद्यालय येथून ते शिक्षणाचे धडे देऊन विद्यार्थ्यांना घडवत होते. हे सर्व करताना सुद्धा पत्रकारिता जोपासत हिंदी, मराठी वर्तमानपत्रातून त्यांनी आपली पत्रकारितेची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अकालीत जाण्याने पत्रकार संघाची खूप मोठी हानी झाली आहे. पत्रकार संघटनेतर्फे आणि वैनगंगा न्यूज लाईव्ह यूट्यूब चैनल, जनवारता भारत डॉट कॉम न्यूज पोर्टल, आणि दरारा 24 न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण अश्रूपूर्ण श्रद्धांजली!
0 Comments