चंद्रपूर-अवैध गौण खनिजांवर अंकुश तथा दंडात्मक कारवायां करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा खनिकर्म विभागाच्या पथकांनी आता कंबर कसली असुन शहरा लगतच्या फुकट नगर (जैन लेआऊट जवळ) व भटाळी येथे रेतींची अवैध वाहने पकडली आहे.त्या दोन्ही वाहनांना दंडात्मक कारवायां करण्यासाठी पथकाने ताब्यात घेतले असल्याचे खात्रीलायक वृत्त नुकतेच प्राप्त झाले आहे.
या बाबत हाती आलेल्या माहितीनुसार असे कळते कि वाहन चालक बंडू कर्णुजी थुल हा एम एच 34-एम 9442या वाहनाने तर दुसरा एक वाहन चालक धनराज दिलीप मेश्राम रा.भटाळी हा एम एच 34-ए बी 3480या वाहनांने भल्या सकाळी विना परवाना रेती वाहतूक करीत होता .गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा खनिकर्म विभागाच्या पथकाने सदरहु अवैध रेतींची वाहने पकडून दंडात्मक कारवायांसाठी आपल्या ताब्यात घेतली आहे.
सध्या ती वाहने जिल्हा खनिकर्म विभाग कार्यालय परिसरात ठेवण्यात आली आहे.सदरहु कारवायां चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शनाखाली खनिकर्म विभागातील खनिज निरीक्षक बंडु वरखेडे, दिलीप मोडके व त्यांच्या पथकाने केल्या आहे.
0 Comments