ब्रम्हपुरी :-
महाराष्ट्र राज्य सरकारकडून राज्याच्या आरोग्य विभागामार्फत "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" हे महिलांसाठी एक खास अभियान राज्यभर राबवलं जातं आहे. आज दि. 11/11/22 रोजी ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी तसेच प्रकाशभाऊ खोब्रागडे व क्रिष्णा वैद्य यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्ष्मी नगर कुर्झा प्रभागांमध्ये "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या मोहिमेअंतर्गत महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सदर शिबिरामध्ये एकूण 382महिलांची तपासणी केली असून त्यात 13 महिला ह्या उच्च रक्तदाब 5 महिला मधुमेह व 2 महिला ह्या हृदय रोग या आजाराच्या निदानात्मक झाल्या. तसेच महिलांची कर्करोगाची सुद्धा तपासणी करण्यात आली असून विशेषता कर्करोगावर मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.विद्यानगर, महालक्ष्मी नगर व वाल्मिकी नगर क्षेत्रातील नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबिराला श्री प्रकाशभाऊ खोब्रागडे व श्री क्रिष्णा भाऊ वैद्य हे स्वतःजातीने उपस्थित होते.तसेच ग्रा.रु.ब्रम्हपुरी येथील डॉ. सचिन मेंढे सर, डॉ. खरकाटे मॅडम, अंजिरा आंबीलढुके (समुपदेशक), प्राजक्ता फुलझेले ,(समुपदेशक) तसेच सोनाली पानसे इ.कर्मचारी उपस्थित होते तर महालक्ष्मी नगर, विद्यानगर वार्डातील युवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्स्फूर्त सहभाग दिला.
0 Comments