वैनगंगेच्या उपप्रवाहावर आज झाला मोठ्या पुलाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
जुनगाव: प्रतिनिधी
तालुक्याचे व जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या व सतत पुरामध्ये अडकत असलेल्या जुनगावला लहान व बुडीत पुलामुळे अनेक त्रास सहन करावा लागत होता. यासाठी या नदीवर मोठा पूल व्हावा आणि जुनगाव वासियांची कायमची समस्या सुटावी यासाठी जून गावातील ग्रामपंचायत तिचे उपसरपंच राहुल भाऊ पाल यांनी अथक प्रयत्न करून पालकमंत्री तथा वने व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना वारंवार मागणी करून या पुलाला मंजुरी मिळवून दिली. राहुल पाल आणि गावकऱ्यांच्या हाकेला सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी ओ दिला असून त्यांच्याच प्रयत्नातून या छोट्या नदीवरील बुळीत पुला ऐवजी आता मोठ्या पुलाचा भूमिपूजन कार्यक्रम दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाला.
याप्रसंगी जूनगाववासीय जनतेला मार्गदर्शन करताना सुधीर भाऊंनी सांगितले की या नदीवरील पूल तर पूर्णत्वास येईलच, परंतु गडचिरोली चामोर्शी हा सरळ मार्ग सुकर व्हावा यासाठी सुद्धा वैनगंगेच्या मोठ्या नदीवर 70 कोटी रुपयांच्या पुलास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिलेली आहे. त्या दिशेने प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन त्या पुलाला सुद्धा लवकरच सुरुवात होईल असा ठाम विश्वास गाववासियांना मंत्री महोदयांनी दिला.
आज तालुक्यात गंगापूर टोक येथील पूर्णत्वास आलेल्या फुलाचा लोकार्पण सोहळा मंत्री महोदय यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर घाटकोळ येथे साहित्य संमेलनाला ते उपस्थित होऊन जुनगाव येथील या भव्य आणि दिव्य कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांचे आगमन होताच गावात फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी लेझीमच्या तालावर मंत्री महोदयांना सभास्थळी वाजत गाजत आणण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराव भाऊ भोंगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोने, उपविभागीय अभियंता मान. मुकेश तांगडे साहेब, सरपंच सौ. चुधरी ताई, उपसरपंच तथा भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे तहसील उपाध्यक्ष राहुल भाऊ पाल, ग्रामपंचायत सदस्य विश्व भाकरे, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक पांडुरंग जी पाल, खुशालजी भोयर, रेखचंद आभारे, विक्रम पाल, देवानंद चिंचोलकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती विनोद भाऊ देशमुख, पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी, प्रफुल्लचंद चुधरी महामंत्री ओम देवपाल, हरीश जी ढवस, व मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला खचाखच गर्दी भरलेली होती. या गर्दीला पाहून मंत्री महोदयांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी तुमच्या कुठल्याही अळी अडचणी आल्या तर मी त्या सोडवण्यास तत्पर आहे. जसं तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केलं त्या प्रेमाची परतफेड करण्याची माझ्यात क्षमता आहे आणि ते मी करणारच. सुधीर भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है हा नारा तुम्ही माझ्यासाठी लावला परंतु मी आता असा नारा तुम्हाला लावून जातो, की जुनगाव वाले आगे बढो सुधीर मुनगंटीवार तुम्हारे साथ है; या त्यांच्या वाक्यावर सभास्थळी असणाऱ्या संपूर्ण महिला आणि पुरुषांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांना आशीर्वाद दिलेत.
0 Comments