Ticker

6/recent/ticker-posts

खासदार बाळूभाऊ धानोरकर आज पोंभुर्णा तालुक्याच्या दौऱ्यावर



पोंभुर्णा: काँग्रेसचे खासदार बाळू भाऊ धानोरकर हे आज दिनांक १ डिसेंबर रोजी पोंभुर्णा तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवींद्र भाऊ मरपलीवार यांनी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. खासदार धानोरकर हे घोसरी येथे दुपारी दीड वाजताच्या सुमारास उपस्थित होणार असून त्यानंतर ते दोन वाजता देवाडा बुद्रुक, चेक ठाणा, मोहाळा व अन्य गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असून नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून समस्यांचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवींद्र जी मरपल्लीवार यांनी केले आहे.


सायंकाळी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक होऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन खासदार महोदय करणार आहेत. या संधीचा फायदा घेऊन आपल्या अडी अडचणी, शेत पिकातील नुकसान, वाघाची भीती,वन विभागाच्या, कृषी विभागाच्या, महसूल विभागाच्या व इतर सर्व विभागाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नागरिकांनी आपापली निवेदने अर्ज घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन तालुका काँग्रेसने केले आहे.

Post a Comment

0 Comments