.......................................
संतोष कुळमेथे
राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा - बहुजन, मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीला पुढे नेण्यासाठी आणि प्रस्थापित व्यवस्थेने समाजमनावर निर्माण केलेले गैरसमज, अंधश्रद्धा, वाईट प्रथांना मुठमाती देण्याकरिता महात्मा फुले यांच्या विचारावर चालणाऱ्या सामाजिक चळवळीत सत्याचा शोध घेणारे युवक निर्माण होण्याची आज समाजाला गरज आहे.ते कार्य तुलाना येथिल महात्मा फुले सार्व.वाचनालय चालविणारे युवक करीत असल्याने त्यांचा सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार गोंडवाना शिक्षण संस्थेचे सचिव तथा पाचगाव ग्राम पंचायत सदस्य बापुराव मडावी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी कार्यालयात तसेच तुलाना प्राथ.शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुधाकरजी हेपट यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना व्यक्त केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी व जि.प.शाळा तुलाना चे मुख्याध्यापक श्री.सुधाकरजी हेपट यांचा निरोप सत्कार समारंभ महात्मा फुले वाचनालय मंडळाच्या पुढाकाराने तुलाना ग्रामस्थांनी आयोजित केला होता.अध्यक्षस्थानी तुलाना चे सुपुत्र तथा टेबुरवाही ग्रा.प.सरपंच रामकृष्ण मडावी होते.प्रमुख अतिथी ग्रा.प.सदस्य निलकंठ राऊत,सदस्या सौ.अनिता साईनाथ वांद्रे,सौ.शुभांगी आत्राम, सामाजिक कार्यकर्ते बापुराव मडावी, सामाजिक कार्यात सदैव योगदान देणारे नरेंद्र उमक,सोमेश्वर घोंगे,शाळा व्यवस्थापन समिती च्या सौ.सुषमा वांढरे, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनित राऊत,प्रेमसागर राऊत व सदस्य उपस्थित होते.
सन्मा. हेपट सर सेवानिवृतीने गाव व शाळा सोडून जात असले तरी त्यांनी गावात निर्माण केलेले ऋणानुबंध आमच्या हृदयात आहे ते आम्ही विसरनार नाही, त्यांच्या प्रती ग्रामस्थ कृतज्ञ राहील अशी भावना अध्यक्षिय भाषणात सरपंच रामकृष्ण मडावी यांनी व्यक्त केली.ग्रामस्थांच्या वतीने मुख्याध्यापक सुधाकर हेपट यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. गेल्या दहा वर्षांत तुलाना ग्रामस्थांनी मला जो मान-सन्मान,स्नेह दिला तो मला विसरता येणार नाही असे सत्काराला उत्तर देताना हेपट सर यांनी मनोगतातून भावना प्रगट केल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितेश चांदेकर, निखिल झाडे,सुरज टेकाम, अनिकेत राऊत,हर्षल वांढरे, सचिन घोंगे,शुभम भंडारे, गणेश क्षिरसागर,उज्वल राऊत सागर मोहुर्ले,प्रमोद टेकाम, यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक नितेश चांदेकर,संचालन श्री.नवले सर तर उपस्थितांचे आभार निखिल झाडे यांनी मानले. कार्यक्रमा नंतर समाजप्रबोधन पर "जयंती" हा चित्रपट दाखवण्यात आला.
0 Comments