पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथील रहिवासी असलेले आदिवासी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती दिलीप गुलाबराव मेश्राम यांचे आज दुपारी तीन वाजता चे सुमारास अल्पशा आजाराने त्यांचे राहते घरीच दुःखद निधन झाले.
त्यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांचे कुटुंब पोरके पडले असून त्यांना पत्नी कविता, मुली, जावई, नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे. परंतु त्यांना मुलगा नसल्याने त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या त्यांच्या पत्नीची हालपष्ठा होणार असल्याची चर्चा मृत्यू दरम्यान लोकांमध्ये ऐकायला मिळत आहे.
त्यांच्या या मृत्यूमुळे कार्तिकी काला निमित्त दरवर्षी होणारा कार्यक्रम समोर ढकलला जातो की काय अशी शंका उपस्थित झाली आहे. दरवर्षी कार्तिकी काल्याचा सर्वात मोठा कार्यक्रम या गावात होत असतो. यावर्षी सुद्धा आज दिनांक ०६ नोव्हेंबर रोजी काला बसणार असून उद्या तो पौर्णिमेच्या दिवशी फुटणार आणि महाप्रसादाचा कार्यक्रम म्हणून संपूर्ण गावात जेवणाचा कार्यक्रम असतो. परंतु या घटनेमुळे या कार्यक्रमाला पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तूर्तास या गावातील ज्येष्ठ मंडळी यावर विचार विमर्श करून निर्णय घेणार असल्याचे समजते.
0 Comments