Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे हळदा येथे अैवध दारू विक्री ने गाठला कळस- नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आवर घालतील काय ?

पोलीस अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे हळदा येथे अैवध दारू विक्री ने गाठला कळस- नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आवर घालतील काय ?



ब्रम्हपुरी:-

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेवटच्या सिमेवर असलेल्या हळदा येथे बिट जमादाराच्या दुर्लक्षित धोरणामुळे अैवध दारू विक्री मोठ्या जोमात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देशी दारू सह बनावट सिंधी दारू व देशी दारूची खुलेआम विक्री होत आहे मात्र याकडे पोलिस विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे या अैवध दारू विक्री मुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हळदा कुडेसावली गावात मोठ्या प्रमाणात अैवध दारू विक्री होत असल्याने दिवस व रात्री तर रस्त्याने दारूड्यांची जत्रा च असते सायंकाळच्या सुमारास शेतातून येणाऱ्या महीलांना या दारूड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो या अैवध दारू विक्री मुळे गावातील शांतता भंग होणाच्या मार्गावर आहे. या अैवध दारू विक्री करणाऱ्यांना कोणाचे आशीर्वाद आहे हे जनतेला न समजणारेच आहे. ईतक्या मोठ्या प्रमाणात सिंधी दारू, देशी दारू, गावठी दारूची खुलेआम विक्री करण्यात येत आहे परंतु अद्यापही पोलीसां कडून कुठल्याही प्रकारची कारवाई होतांना दिसून येत नाही. यामुळे या अैवध दारू विक्री करणाऱ्यांची दिवसेंदिवस हिम्मत वाढत जात आहे. तत्कालीन बिट जमादाराच्या काळात हळदा येथील अैवध दारू विक्री वर लगाम लावला होता मात्र विद्यमान बिटजमादार अैवध दारू विक्रीवर लगाम लावण्यास यशस्वी होतील का हे पाहणे आवश्यक असल्याचे हळदा येथील नागरिकांकडून बोलले जात आहे. तर नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक या अवैध दारू व्यावसायिकांवर आवर घालतील का या कडे ग्रामस्थांची लक्ष लागलेले आहे.

Post a Comment

0 Comments