राहुल श्रीराम भोयर ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी:- सुंदर नगर येतील युवक श्री.अमित रोकडे यांनी महाराष्ट्र राज्याचे वन, मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना सुंदर नगर वार्डाच्या विकासासाठी साकडे घातले व अनेक विकास कामांसाठी मागणी केली.
ब्रम्हपुरी शहरातील सुंदर नगर परिसर हा गेल्या 25 वर्षा पासून रस्ते,पाणी,नाल्या ह्या सुविधा पासून येथील नागरिक वंचित आहे .
मुख्यतो कामगार वर्गाचा अश्राय स्थान आहे. लगतच्या जिल्ह्यातील अनेक परिवार रोजगाराच्या शोधात ब्रम्हपुरीतील सुंदर नगर येते स्थायिक झाले.
मात्र गेल्या अनेक वर्षापासून हा भाग पिण्याचे पाणी,रस्ते, नाल्या या सारख्या मूलभूत गरजांपासून वंचित राहिलेला आहे.आवश्यकते नुसार विकास कामे झालेली नाहीत. नावात सुंदर असला तरी सर्वत्र अस्वच्छता आहे. यामुळे रोगराई,सर्प दंश इ. यांची सतत भीती असते.पिण्याच्या पाण्यासाठी घरा घरात पाइप लाईन नाही. रस्त्यांची दुर्दशा आहे.पावसाळ्यात तर कपडे घान झाल्याशिवाय बाहेर कामाला जाता येत नाहीत.
सदर अडचणींवर प्रकाश टाकत सुंदर नगर येतील नागरिकांच्या या मोठ्या अडचणी कडे पालकमंत्र्यांचा लक्ष वेधण्याचा यशस्वी प्रयत्न अमित रोकडे यांनी केला त्यावेळी ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार अतुल भाऊ देशकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भाऊ गाजपुरे,नगरसेवक मनोज भाऊ वठे, शहर अध्यक्ष अरविंद भाऊ नंदुरकर,युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुयोग बाळबुद्धे युवा मोर्चा उपाध्यक्ष अमित रोकडे ,पुष्पदीप पिलेवान, रोहित दिघोरे,दिगंबर भरणे,सचिन बागडे,नंदकिशोर नागपुरे डिकेश मडावी व सुंदर नगरातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अमित रोकडे यांचा आभार मानला आहे.
0 Comments