( विक्रमी हजारो लोकांचा सहभाग,गोंडी नृत्य आणि टाळ गजरात बैलबंडी ने लक्ष वेधले.)
जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, युवक बेरोजगार आणी महिलांच्या ज्वलंत मागण्यासाठी श्री. अतुलभाऊ गण्यारपवार माजी कृषि व पशुसंवर्धन सभापती,शेतकरी नेते यांच्या नेतृत्वात जिल्हयात 15 डिसेंबर 2022 ला आष्टी व 16 डिसेंबर 2022 चामोर्शी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सोबतच अधिक व्यापक पद्धतीत सरकारचे लक्ष वेधण्याकरिता दि.19 डिसें 2022 ला लक्षवेध जनआंदोलन इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथपर्यंत बैलबंडी, गोंडी नूत्य करत, टाळगजराच्या आनंदमय वातावरणात पदयात्रा करत अतिशय शांततेच्या मार्गांने हजारो जनतेसह मा.जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा, याकरिता कृषी, सिंचन, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, दळणवळण, उद्योग, बेरोजगारी, आरक्षण अशा सगळ्या क्षेत्रातील मुख्य विषय घेऊन अनेक समस्या मांडण्यात आल्या.
सद्या गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्याच्या धानाला हमी भाव मिळावा. तसेच धानाला बोनस मिळाला पाहिजे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,वन्य प्राण्यांपासून शेती पिकाचे नुकसान होते त्याची भरपाई मिळाली पाहिजे. मेडीगट्ट बाधित शेतकऱ्यांना न्याय,स्वामिनाथन आयोगाच्या शिफाशीं लागू करणे,सिंचन, उपसा सिंचन प्रकल्प राबविणे,कोनसरी स्टील प्रकल्प मध्ये नोकरीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे. सूरजागड येथून होत असलेल्या माल वाहतुकीने कापसाचे नुकसान झाले.त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करणे, गावागावात पिण्याच्या पाण्याची सोय, प्रत्येक गावी सार्वजनिक सुलभ शौचालय,ग्रामीण भागात ग्रंथालय स्थापना करणे,मुला मुलींना शिक्षणाकरिता मोफत बस प्रवास योजना राबविणे,ग्रामीण रस्त्याचे रुंदीकरण करणे, शासकीय नोकरीत स्थानिकांना आरक्षण देणे, विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृह सोय करणे, प्रशासकीय दृष्टिकोनातून नवीन तालुक्याची निर्मिती करणे, इंजिनियरिग कॉलेज आणि ITI कॉलेज ची निर्मिती प्रत्येक तालुक्यात करावी.गाव तिथे ग्रंथालय,गाव तिथे व्यायामशाळा,अशा मुख्य मागण्यांसह ७५ प्रमुख मागण्या घेवून लक्षवेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शेतकऱ्यांनी बैलबंडी घेऊन सहभागी झाले.आदिवासी बांधवांनी गडचिरोली च्या मुख्य रस्त्यावर गोंडी नृत्य सादर करीत आंदोलनात भरभरून सहभाग घेतला. युवावर्ग वेगवेगळ्या मागण्यांचे पत्रक दाखवत सहभागी होते. शेतकरी स्त्रिया विशेषत्वाने सहभागी होत्या. कष्टकरी,कामकरी,बेरोजगार युवक,व्यापारी उद्योजक या समाजातील प्रत्येक घटक हिरहिरीने सहभागी झाले.
मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी मोर्चेकरी जनतेला 1 ते 2 तास वेळ देऊन चर्चा केली दिलेल्या मागणी राज्य व केंद्र शासनाकडे मांडून सोडविण्याचे आश्वासन दिले.
0 Comments