गडचिरोली / चक्रधर मेश्राम दि. 23/12/2022:-
लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने एक्यूप्रेशर सहा दिवसाचे शिबिर प्राईम हॉस्पिटल गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले . या शिबिरात रुग्णांचे ॲक्युप्रेशर, व्हायब्रेशन, सुजोक पद्धतीने उपचार करण्यात आले. या शिबिराकरिता जोधपुर ,(राजस्थान) येथील डॉ. राजेंद्र सारन, डॉ. प्रेम चौधरी व डॉ. मुकेश चौधरी यांनी रुग्णांना सेवा दिली तसेच योग्य मार्गदर्शन केले. या शिबिरात 125 रुग्णावर सतत सहा दिवस उपचार करण्यात आले. शिबिराच्या शेवटच्या दिवशी सहभागी रुग्णांनी उपचाराचा फायदा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि पुन्हा हे शिबिर शहरात आयोजित करण्याबाबत लायन्स क्लब ला विनंती केली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबच्या अध्यक्ष डॉ. सविता साधमवार, सचिव महेश बोरेवार, कोषाध्यक्ष ममता कुकुडपवार, संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पद्मावार, प्राईम हॉस्पिटलचे संचालक इमरान लाखानी व त्यांची संपूर्ण टीम, सदस्य मदत जिवाणी, डॉक्टर सुरेश लडके, प्रा. देवानंद कामडी, प्रा. शेषराव येलेकर, सतीश पवार, नितीन चेंबूलवार, नादिर भामाणी, परवीन भामानी, शालिनी निंबार्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments