संतोष कुळमेथे
राजुरा तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्यास भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. परंतु दोन महिन्याच्या कालावधीत होऊन सुद्धा राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे अर्ज प्रलंबित आहेत.शासनाने विद्यार्थ्यांच्या विचार करता अर्जासाठी मुदतवाढ देण्यात यावी. शासनाने प्रलंबित अर्जाचा विचार करता विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारे नुकसान न होता आणि स्वाधार योजनेच्या अंतर्गत कोणताही विद्यार्थी वंचित न राहता त्याकरिता स्वाधार योजनेची मुदतवाढ करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे सिद्धांत पुणेकर यांनी सहायक समाजकल्याण आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याकरिता उपस्थित पियुष गाडे, तेजस देवगडे, आदित्य शेंडे, साहिल लभाने,कपिल चुनारकर व वंचित बहुजन आघाडीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments