Ticker

6/recent/ticker-posts

महाकाली मंदिराच्या विकासासाठी पुरातत्व विभागाने परवाणगी द्यावी, केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेत मागणी - आवश्यकता पडल्यास मंदिराच्या विकासासाठी कायद्यात बदल करू, केंद्रीय मंत्र्यांचे आश्वासन सकारात्मक चर्चा, प्रसाद योजने अंतर्गत अंचलेश्वर मंदिराचा विकास करण्याचीही मागणी




सकारात्मक चर्चा, प्रसाद योजने अंतर्गत अंचलेश्वर मंदिराचा विकास करण्याचीही मागणी

चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराच्या पहिल्या आणि दुस-या टप्यातील विकासकामांसाठी एकत्रित परवागणी देण्यात यावी तसेच प्रसाद योजने अंतर्गत अंचलेश्वर मंदिराचा विकास करण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेत केली आहे. यावेळी दोन्ही मागण्यांसदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. सदर मंदिराच्या विकासासाठी आवश्यकता पडल्यास कायद्यात बदल करू असे आश्वासन केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना दिले असून केंद्राकडून सदर कामासाठी योग्य मदत केल्या जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यावेळी जी. किशन रेड्डी यांचे पर्सनल सचिव आशुतोष सलील यांची उपस्थिती होती.
गोंड कालीन वारसा लाभलेल्या चंद्रपूर जिल्हात अनेक प्राचीन वास्तु आहेत. माता महाकाली मंदिर गोंड कालीन असुन लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे या मंदिराच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे नगर विकासमंत्री असतांना सदर मंदिराच्या विकासासाठी पहिल्या टप्यात 60 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. तर आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर दुस-या टप्यातील विकास कामासाठी 75 कोटी रुपयांचा निधी देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे. मात्र या मंदिराच्या विकासकामात पुरातत्व विभागाची अडचण येत आहे. त्यामुळे सदर विकासकामाला पूरातत्व विभागाने मंजुरी द्यावी यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पाठपूरावा सुरु केला आहे. दरम्याण आज गुरुवारी त्यांनी दिल्ली येथील मंत्रालयात केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेत या संदर्भात चर्चा केली आहे. यावेळी मंदिराच्या विकासकामात पूरातत्व विभागाच्या येत असलेल्या अडचणी बाबत माहिती दिली आहे. मंदिराच्या मुळ रचनेत कोणताही बदल न करता करण्यात येणार असलेल्या विकासकामाला पुरातत्व विभागाने तात्काळ परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. यावेळी सदर कामाला पुरातत्व विभागाची अडचण सोडविण्याच्या दिशेने प्रयत्न करून आवश्यकता असल्यास कायद्यात बदल करू असे केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी म्हटले आहे.
  केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रसाद योजने अंतर्गत चंद्रपूरातील प्राचीन अंचलेश्वर मंदिराच्या विकासकामाला लवकर सुरवात करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. यावेळी सदर विकासकामाबाबत आपला अहवाल व पत्र प्राप्त झाले असल्याचे पर्यटन विभागाने कळविले असुन या योजने अंतर्गत 14 मंदिरांमध्ये अंचलेश्वर मंदिराचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगतले आहे. याचे कामही लवकर सुरु करणार असल्याचे केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी म्हटले आहे. चंद्रपूर येथील विकास कामात सांस्कृतिक व पर्यटन विभागांतर्गत येत असलेल्या अडचणी प्राथमिकतेने सोडविल्या जातील केंद्राकडून योग्य ते सहकार्य चंद्रपूरच्या विकास कामात केले जाईल असे आश्वासन यावेळी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिले आहे.
   चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराच्या पहिल्या आणि दुस-या टप्यातील विकास कामांसाठी एकत्रीत परवागणी देण्यात यावी तसेच प्रसाद योजने अंतर्गत अंचलेश्वर मंदिराचा विकास करण्यात यावा या मागणीसाठी आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी पर्यटन विभागाचे केंद्रीय सचिव अरविंद सिंग तथा सांस्कृतिक विभागाचे केंद्रीय संयुक्त सचिव संजुक्ता मुदगल यांची देखील दिल्ली येथे बैठक घेत चर्चा केली आहे. यावेळी दोनही मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे.

Post a Comment

0 Comments