विजय जाधव (तालुका प्रतिनिधी,मुल)
यावर्षी प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडल्याने तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची भात पिके, सोयाबीन तसेच कापूस उत्पादकांची प्रचंड मोठी हानी झाली. आज पर्यंतच्या इतिहासातील प्रथमताच पोंभुर्णा तालुक्या लगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीला तब्बल सहा वेळा पूर आल्याने तालुक्यातील नदीकाठावरील शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याने बुडल्याने शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक नुकसान झाली.
त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली डुबल्याने काही शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करूनही भात पिक हाती न आल्याने काही शेतकऱ्यांनी (ग्रामीण भाषेत) चिखल परे भरून खाजगी सावकारांकडून मनमानी व्याजदरानुसार कर्जाऊ रकमा घेऊन कशीबशी आपली रोगणी आटोपली. परंतु अतिवृष्टीमुळे आणि धान पिकांवर होणाऱ्या विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे हातची पिके वाया गेली.
तालुक्यातील प्रत्येक शेतकरी हतबल झाला. शेतकऱ्यांची होत असलेली हदबलता आणि आर्थिक नुकसान याकडे लक्ष वेधून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन जिल्ह्यातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकरिता प्रत्यक्ष बांधावर जाऊन तलाठी कृषी सहाय्यक इत्यादी कर्मचाऱ्यांच्या मार्फतीने सर्वेक्षण करून माहिती घेऊन अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी, जशा सूचना शासनातर्फे करण्यात आल्या, त्याप्रमाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात त्यानुसार सर्वेक्षण करून शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष नुकसान भरपाईची रक्कम तहसील कार्यालयामार्फत जमा करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. परंतु पोभूणा तालुका याला अपवाद ठरला असून या तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दीड दमडी सुद्धा जमा झाली नाही. विशेषता घोसरी साज्यातील जवळपास 800 शेतकरी बांधव असून सदर तालुक्यात घोसरी साजला कृषी सहाय्यक यांच्याकडे सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती, परंतु सदर कृषी सहाय्यक महाशयांनी घरबसल्या सर्वे करून आपल्या मनमर्जीने आर्थिक हेतू साध्य करून आपल्या हितचिंतकाची, बोटावर मोजण्या इतकी शेतकऱ्यांची नावे पाठविल्याचे दिसून आले. आणि या कृषी सहाय्यक महोदयांनी खऱ्या नुकसान भरपाई ग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी ग्रस्त लाभापासून वंचित ठेवले. यामुळे संपूर्ण तालुक्यात असाच प्रकार दिसून येत असल्याने तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी आर्थिक लाभापासून वंचित असून त्यांचेवर अन्याय झाला आहे.
या गंभीर बाबीची दखल घेऊन तालुका काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष रवी भाऊ हे मरपल्लीवार, तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ओमेश्वर जी पद्मगिरीवार , माजी नगरसेवक जयपाल गेडाम, अशोक गेडाम,इत्यादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळासह चंद्रपूर वनी आणि लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे लोकप्रिय खासदार माननीय धानोरकर यांना प्रत्यक्ष भेटून आपली कैफियत मांडली. व पुनर सर्वेक्षण करून अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळवून द्यावी अशा आशयाचे निवेदन माननीय खासदार महोदयांना देण्यात आले.
यावेळी पोंभुर्णा तालुक्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवी भाऊ मरपल्लीवार यांचे समवेत संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments