Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यकार्यपालन अधिका-यांनी बजावली चांदापूरचा सरपंचासह तीन सदस्यांना कारणे दाखवा नोटीस




स्मशानभुमी जागेबाबतचे प्रकरण,ग्राम पंचायतने आपल्या कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका

मूल.ता.-गावातील स्मशानभुमी जागेबाबत न्यायालयाचे आदेश असतांना त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून आपल्या कर्तव्यात कसुन केल्याने चांदापूर ग्राम पंचायतीच्या सरपंच सोनी कालीदास देशमुख यांच्यासह तीन सदस्यांना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीस मुळे अपात्र होण्याची टांगती तलवार लटकु  लागल्याने चारही जण चांगलेच धास्तावले आहे.
       चांदापूर हे मूल तालुक्यातील संवेदनशील गाव मानले जाते. गावातील स्मशानभुमीसाठी असलेल्या जागेत गावातील काही लोकांनी अतीक्रमण केले असल्याने त्याविरोधात चांदापूरचे तत्कालीन सरपंच आणि विदयमान उपसरपंच अशोक मार्गनवार यांनी ग्राम पंचायतीच्या वतीने न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. न्यायालयाने 8 एप्रील 2015 ला ग्राम पंचायतीचा बाजुने निकाल देऊन स्मशानभुमीवरील अतीक्रमणं काढण्याचे ग्राम पंचायतीला आदेश केले. मधल्या काळात ग्राम पंचायती वर सत्ता असणा-यांनी या प्रकरणाकडे पार दुर्लक्ष केले.  न्यायालयाचे आदेश होऊनही ग्राम पंचायत कारवाई करीत नसल्याने उपसरपंच मार्गनवार यांनी सरपंच सोनी देशमुख, विनोद कोहपरे,प्रफुल तिवाडे आणि प्रतीक्षा नागापूर या तीन ग्राम पंचायत सदस्यां विरूध्द जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी यांचेकडे 24 नोव्हेबंर 2021 मध्ये तक्रार केली. मार्गनवार यांनी तक्रारीत नमुद केलेल्या मुद्दयांनुसार मुख्यकार्यपालन अधिकारी यांनी सिंदेवाही पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचे मार्फतीने चौकशी केली असता गट विकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेला दिलेल्या अहवालात स्मशानभुमी जागेबाबतचा प्रकरणात सरपंचासह तीन सदस्यांना कसुरवार ठरविले. तसेच ग्राम पंचायतीच्या 18 जानेवारीचा मासीकसभेत या विषयावर ठराव घेतला असतांना सरपंच सोनी देशमुख आणि इतर तीन्ही सदस्यांनी जाणीपुर्वक दुर्लक्ष करून अतीक्रमण धारकांना सहकार्य करीत असल्याचे दिसुन येते. स्मशानभुमी जागेबाबत न्यायालयाने आणि सहायक अधिक्षक(जमीन) यांनी दिलेल्या आदेशाचे अवमान करून सरपंच हे मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार मार्गनवार यांनी केली.ं
      मुख्यकार्यपालन अधिकारी यांनी बजाविलेल्या नोटीसमुळे सरपंचासह तीनही सदस्य अपात्र होण्याची शक्यता असुन ते चांगलेच हादरले आहे. सदरची कारवाई टाळण्यासाठी सरपंच सोनी देशमुख,विनोद कोहपरे,प्रफुल तिवाडे आणि प्रतिक्षा नागापूरे यांनी राजकीय मार्गाने प्रयत्न चालविले आहे.
[उपसरपंच मार्गनवार यांच्या विरोधातील तक्रार म्हणजे षडयंत्राचा भाग- 23 डिसेंबरला चांदापूरच्या सरपंच सोनी देशमुख यांनी उपसरपंच अशोक मार्गनवार यांच्या विरोधात दिलेली तक्रार म्हणजे एक प्रकारचे षडयंत्र असुन आपल्यासह तीन सदस्यांवर होणा-या कारवाई विरोधात मार्गनवार यांचेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. मार्गनवार यांनी केलेल्या तक्रारीचा अनुषंगाने मुख्य कार्यपालन अधिका-यांनी कार्यवाहीस प्रारंभ करून नोटीस बजाविल्यामुळे खवळलेल्या सरपंच आणि तीन्ही सदस्यांनी मिळुन हा षडयंत्र घडवुन आणल्याची गावात चर्चा आहे.]


Post a Comment

0 Comments