गतिमान सरकार व सशक्त भारत निर्माण करण्यासाठी भाजप सोबत राहण्याचे आवाहन--नामदार रवींद्र चव्हाण.
प्रलंबित योजना मंजूर करण्याची दिली ग्वाही.
500 कोटीच्या वर निधी दिल्याने शिंदे फडणवीस सरकार ला मतदार संघ विसणार नाही-- आमदार बंटीभाऊ भांगडिया.
अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी
नागभीड----चिमूर मतदार संघात आमदार बंटीभाऊ भांगडिया विकास कामे करीत असतांना प्रलंबित विकास कामे असल्याने ती कामे मंजूर करण्याची ग्वाही कॅबिनेट मंत्री नामदार रवींद्र चव्हाण म्हणाले की मागील अडीच वर्षात विकासाला ग्रहण लागले होते.परंतु शिंदे फडणवीस सरकारने अवघ्या सहा महिन्यात अनेक विकासाचे निर्णय घेण्यात आले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या हितासाठी, समाजातील शेवटच्या माणसा पर्यत योजनेचा लाभ मिळावा यासाठी अनेक योजना कार्यान्वित करीत असल्याचे सांगत गतिमान सरकार करण्यासाठी गाव शहर रस्ते जोडून समृद्धी कडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्न होत आहे. येणाऱ्या काळात शत प्रतिशत सशक्त भारत करण्यासाठी भाजप सोबत राहण्याचे आवाहन केले.
नागभीड येथे विकास कामाचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा प्रसंगी बांधकाम कॅबिनेट मंत्री नामदार रवींद्र चव्हाण बोलत होते.
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी महाविकास आघाडी सरकारने अन्याय करीत निधी देण्यात अडथळे निर्माण केल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात चिमूर विधानसभा क्षेत्रात भरपूर निधी दिल्याचे सांगत पुढे म्हणाले की उपजिल्हा रुग्णालय नागभीड साठी 32 कोटी ,घोडाझरी, शिवटेकडी च्या पर्यटकांसाठी सुसज्ज विश्राम गृह बांधकाम निधी ,जलजीवन पाणी पुरवठा योजना, नागपूर -नागभीड, वडसा नागभीड ब्रांडगेज मेट्रो मंजूरी झाल्याचे सांगत नागपूर हिवाळी अधिवेशनात चिमूर विकास कामा साठी 50 कोटी मंजूर केल्याचे सांगत मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने एकही दमडी दिली नसल्याची टीका करीत सहा महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात कोटी रुपयांचे विकास कामे मंजूर केल्याने अभिनंदन केले.शिंदे फडणवीस सरकारने अवघ्या सहा महिन्यात 500 कोटी रू च्या वर निधी दिल्याने चिमूर मतदार संघ विसरणार नाही
यावेळी आमदार बंटीभाऊ भांगडिया, गोपालजी बंग हैद्राबाद , राज्य सचिव साळुंखे, भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजूकर भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे , भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार भाजप जिल्हा संघटन मंत्री संजय गजपुरे , माजी नगराध्यक्ष प्रा उमाजी हिरे भाजप तालुका में भाजप महिला आघाडी चिमूर तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे, माजी जीप सदस्य ममता डुकरे, महिला आघाडी नागभीड तालुका महामंत्री उजवला माटे, ईश्वर मेश्राम, दीपक उराडे, तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन गणेश तर्वेकर तर राजु देवतळे आभार यांनी केले. नागभीड सह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवेश पठाण , सचिन आकुलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी केले.
0 Comments