कोरपणा:वन्यजीव आणि मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालले असून यात विदर्भातील अनेक लोकांचे बळी गेले आहेत. रोज कुठे ना कुठे वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. काल सायंकाळच्या सुमारास एका नववर्षीय बालकास बिबट्याने घटना घडली आहे.
कोरपना तालुक्यातील बेलगाव जांभुळा शेत शिवारात आई-वडिलांसह शेतात काम करीत असताना अंदाजे सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास एका नववर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून जंगलात अर्धा किलोमीटर फरकळत नेले. सदर घटना 25 डिसेंबर रोजी घडली असून भूक लागली म्हणून तो डब्बा घेण्यासाठी धुर्यावर आला असता अचानकपणे बिबट्याने हल्ला केल्याचे कळते.
बिबट्या मुलाला जंगलात फरकडत नेत असताना जवळच असलेल्या जनावरे चारत असलेल्या देवराव धुर्वे यांनी आरडाओरडा करून बिबट्याला पडून लावले. पण तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला होता. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. बातमी लिहि पर्यंत पुढील तपास सुरू होता.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने परिसरातील गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून मागील आठवड्याभरात सदर बिबट्या हा कोरपणा तालुक्यातील विविध शेत शिवारात अनेकांना दिसल्याची माहिती असून वन विभागाने त्या बिबट्याला लवकरात लवकर जेर बंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
0 Comments