पोंभुर्णा: शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे साजरी करण्यात आली.
याप्रसंगी गरीब व शोषित पीडित महिला मेघा पिंपळशेंडे यांना भाजपा महिला आघाडीने दैनंदिन गरजा पूर्ण करू शकत नसल्यामुळे त्यांना किराणा किट आणि साडी जोडी व मुलींसाठी कपडे देऊन सावित्रीच्या लेकीने एका साक्षात सावित्रीला सहकार्य करून खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि वारसा या कार्यक्रमात दिसून आला.
याप्रसंगी भाजपाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अलका आत्राम, नगराध्यक्ष सुलभाताई पिपरे, उपनगराध्यक्ष अजित भाऊ मंगळगिरीवार, महामंत्री हरीश ढवस, मोहन चलाख, नगरसेविका नंदा कोटरंगे, नगरसेविका श्वेता वनकर, जिल्हा सचिव रजिया कुरेशी, शहराध्यक्ष वैशाली बोलमवार, सुनिता मॅकलवार, मीना मूलकलवार, संगीता जिलकुंटावार, अविनाश डोंगरे, विकास दिवसे, राजू ठाकरे, अरविंद दातारकर इत्यादी उपस्थित होते.
0 Comments