Ticker

6/recent/ticker-posts

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती पंचायत समिती सावली येथे मोठ्या थाटामाटात संपन्न* *प्रतिमेला दीपप्रज्वलन माल्यार्पन करून गट विकास अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी केले विनम्र अभिवादन*



 चंद्रपूर (सावली) :-

      पंचायत समिती कार्यालय सावली च्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह सावली येथे आज दि. ३/१/२०२३ ला स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी,तथा पहिल्या भारतीय शिक्षिका,मुख्याध्यापिका,समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चे औचित्य साधुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

उपस्थित महिला अधिकारी तथा कर्मचारी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित गितगायन करीत अभिवादन केले. 
      याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकताना उपस्थित मान्यवर मा. गट विकास अधिकारी यांनी संबोधित करताना म्हटले की, या महान क्रांतीज्योती मुळे प्रत्येक स्त्री स्वावलंबी झाली आज समाजात स्त्रियांना मोलाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळवून मोठ्या मान सन्मानाने कार्य करीत आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ति जगाचा उद्धार करी. 
   अशा थोर विचारवंत समाजसुधारीका , क्रांतीज्योतीची विचारसरणी अंगीकारल्यास सर्व सामान्यास सुद्धा जीवनाचं सोनं करता येईल असे प्रतिपादन केले. 


   त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांनी सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा नखाते यांनी केले तर 
आभार पि.एस.भरडकर यांनी मानले. 
    यावेळी पंचायत समिती सावली चे मा.गट विकास अधिकारी, तथा प्रशासक सुनिता मरस्कोले मॅडम, पंचायत विस्तार अधिकारी आर. जी. परसावार साहेब, बालविकास अधिकारी प्रमोद जोनमवार साहेब,एस. सी. देवतळे साहेब,तसेच पंचायत समितीचे सर्व विभागीय अधिकारी तथा कर्मचारी वृंद उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments