Ticker

6/recent/ticker-posts

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन अंतर्गत उमरी पोतदार येथे समुदाय व पालक मेळावा संपन्न



पोंभुर्णा उमरी पोतदार :- दिनांक 29/01/2023 रोज रविवार ला मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरी पोतदार व ग्राम पंचायत उमरी पोतदार यांच्या समन्वयाने "समुदाय व पालक मेळावा" घेण्यात आला.
यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांचे सत्र, त्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्यात. तसेच गावातील नागरिक महिला मंडळ , युवक-युवती ह्यांच्या सुद्धा स्पर्धा घेऊन मॅजिक बसच्या संपूर्ण कामकाजाची माहीती देण्यात आली. पोंभूर्णा तालुक्यामध्ये मॅजिक बसचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे याच्या मार्गदशनाखाली वर्ग 06 ते वर्ग 10 विच्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाच्या माध्यमातून जिवन कौशल्य रुजविण्याचे उपक्रम चालू आहे. 


तसेच पालकांमध्ये शिक्षणाविषयी जाणीव जागृती निर्माण करण्याकरीता ह्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. ह्याचाच एक भाग म्हणून उमरी पोतदार येथे पालक व समुदाय मेळाव्याचे आयोजन केलेले होते तर ह्या कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक म्हणून 
 मा. सौ. ठामेश्वेरी लेनगुरे  
सरपंच ग्रा.प. उमरी पोतदार , कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री मंगेश उपरे 
उपसरपंच ग्रा.प. उमरी पोतदार , प्रमुख अतिथी मा.श्री अनिरुद्ध कदम सर मुख्यध्यापक जि.प. उच्च प्राथ. शाळा उमरी पोतदार, शिक्षक मा. श्री.मधुसुधन टोंगे सर, शिक्षक मा. श्री. सुशील गव्हरे सर, माजी सरपंच मा. सौ. वनिता सिडाम, शा.व्य.समिती मा. श्री रंजन वांढरे, मा. श्री. नवनाथ झबाडे, आरोग्य सेविका मा. कु. रोशना आईटलावार, मॅजिक बस चे तालुका समन्वयक मा.श्री हिराचंद रोहनकर,
 शाळा सहाय्यक अधिकारी प्राची वेल्हेकर, साक्षी लोणारे, विवीध गावचे समुदाय समन्वयक , अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटांच्या महिला गावातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु. शिवानी शेंडे हिने केले, प्रास्ताविक व आभार बजरंग वक्टे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments