Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूर जिल्हा रास्त धान्य दुकानदार सेलच्या अध्यक्षपदी कवडू कुंदावार यांची नियुक्ती -कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये झाली नियुक्ती




पोंभूर्णा :-महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार रास्त धान्य दुकानदार सेलचे प्रदेशाध्यक्ष उमाशंकर अग्रवाल यांनी जिल्हा रास्त दुकानदार सेलच्या अध्यक्षपदी कवडू कुंदावार यांची नियुक्ती करण्यात आली.

रास्त धान्य दुकानदार हे वर्षभर धान्य वाटप करीत असतात.
त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष नसते.रास्त दुकानदारांचे प्रश्न,मागण्या शासनस्तरावर मांडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने रास्त धान्य दुकानदार सेलची निर्मिती करण्यात आली आहे.पोंभूर्णा तालुक्यातील दिघोरी येथील कवडू कुंदावार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रास्त धान्य दुकानदार सेलच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कुंदावार हे पोंभूर्णा तालुका शासकीय रास्त धान्य दुकानदार असोसिएशनचे २००९ पासून तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल तालूक्यात व जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments