परंतु फुटाणा येथील पात्र शेतकरी लाभार्थ्याला सेवा सहकारी संस्थेने पीक कर्ज नाकारल्याने सहायक निबंधक सहकारी संस्था पोंभुर्णा यांनी एका आदेशाद्वारे सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष वासुदेव गोपाळापाल यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून पदावरून हटविले असल्याचे आदेश प्राप्त होतात फुटाणा व तालुक्यात खळबळ माजली आहे.
तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 अ 1 ब तथा महाराष्ट्र शासनाचे व साधारण राजपत्र दिनांक 24 नोव्हेंबर 2021 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार श्री एमडी मेश्राम सहायक निबंधक सहकारी संस्था तालुका पोंभुर्र्णाण जिल्हा चंद्रपूर यांनी श्री वासुदेव पाल यांना सेवा सहकारी संस्था मर्याद ित फुटाणा रजिस्टर नंबर 896 यांना संस्थेच्या संचालक पदावरून काढून टाकल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
तसेच कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना या आदेशाचे दिनांक पासून समितीच्या पुढच्या एका कालावधीपर्यंत मुद्दत समाप्त होईपर्यंत कोणत्याही संस्थेच्या कोणत्याही समितीच्या सदस्य सदस्य म्हणून पुन्हा निवडून येण्यास पुन्हा स्वीकृत केला जाण्यास किंवा पुन्हा नामनिर्देशित केला जाण्यास पात्र असणार नाही . असा आदेश दिनांक 18/ 1/ 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. या आदेशामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
0 Comments