पोंभूर्णा : गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक असा नारा देत शिवसेनेच्या वतीने पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून पोंभूर्णा शहरात राजराजेश्वर सभागृह येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) गटातर्फे महिला मेळावा,व हळदी कुंकू कार्यक्रम,शहर महिला आघाडी तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन मनस्वीताई संदीप गिऱ्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख तथा आष्टाचे सरपंच किरणताई किशोर डाखरे, प्रमुख उपस्थिती वर्षाताई विलास मोगरकार, नगरसेविका न.पं.रामेश्वरीताई गणेश वासलवार,शहर महिला संघटीका कांताबाई मेश्राम,ललिता कोवे,भाविका मडावी,रोशनी देवताळे,रेखा निमगडे,रजनी कोटरंगे,मेघा मानकर,सोनी मानकर,अर्जना कोसरे,व आदी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर महिला मेळावा,व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात उत्तम प्रतिसादाने संपन्न झाला.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शिवसेना पक्ष अधिक मजबूत, बळकट करण्याच्या सूचना दिल्या व महिला पदाधिकारी कार्यकर्ते चांगले व योग्य रीतीने काम करीत असल्याचे सांगत महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख गणेश वासलवार,युवासेना तालुका प्रमुख अभिषेक बद्दलवार,शहरप्रमुख महेश श्रीगिरीवार,आशिष कावळे,किशोर डाखरे, यांनी मोलाचे सहकार्य केले. या मेळाव्याला महिला कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्विनी मेश्राम, आभार प्रदर्शन नगरसेवक गणेश वासलवार यांनी केले.
0 Comments