तालुका प्रतिनिधी
३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिला आपापल्या पद्धतीने सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करतात. तालुक्यातील जुनगाव येथील "उज्वल ग्राम संघ" आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी सरपंच तथा पत्रकार जीवनदास गेडाम हे लाभले होते, तर उद्घाटक म्हणून भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष व ग्रामपंचायत जुनगाव चे सरपंच श्री राहुल भाऊ पाल हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य विश्वेश्वर भाकरे, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ संगीता ताई झबाळे, सौ चुधरी ताई, आशाताई झाडे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या फोटोची पूजा अर्चा करून करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनात राहुल भाऊ पाल म्हणाले की सावित्रीबाई फुले या जर जन्माला आल्या नसत्या तर स्त्रिया आजही खूप मागे राहिल्या असत्या. सावित्रीबाईंच्या त्यागामुळेच आज सर्व महिला सुशिक्षित ,शिक्षित अधिकारी, पदाधिकारी झाल्या आहेत.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विश्वेश्वर भाकरे यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवनदास गेडाम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर सखोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी गावातील सर्व महिला बचत गटाच्या सदस्या व बालगोपाल पुरुष उपस्थित होते.
0 Comments