Ticker

6/recent/ticker-posts

बिरसा क्रांती दलाचे जिल्हास्तरीय अधिवेशन चंद्रपूरात संपन्न



संतोष कुळमेथे
राजुरा तालुका प्रतिनिधी

राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले जयंती व संविधान सभेतील आदीमांचा आग्रही आवाज मारांग गोमके जयपालसिह मुंडा जयंती यांच्या संयुक्तविद्यमाने चंद्रपूर येथे बिरसा क्रांती दलाचे जिल्हास्तरीय अधिवेशन श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृह चंद्रपूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ जी मडावी. उद्घाटक पदी चंद्रपूर चे आमदार किशोर भाऊ जोर्गेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून रंगराव काळे राज्य अध्यक्ष, डी. बी. अंबुरे राज्य उपाध्यक्ष,प्रभाकर गेडाम विदर्भ संघटक,किसनराव कोटणाके मोकाशी उपस्थित होते.
जयपालसिंह मुंडा हे आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान संविधान सभेतील आदिवाशी समाजाचे अभ्यासू सदस्य . आपली ठाम भूमिका मांडून अनेक कायदे आदिवासीसाठी करण्यात आग्रही भूमिका. नौकरी सोडून आदिवासीं चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. त्याचे आदर्श घेहुन मुलांनी आपल्या अंगी स्वाभिमान बाळगावा .असे मत बिरसा क्रांती दल संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी ह्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
 राष्ट्रमाता सावित्रीमाई ह्यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देऊन महिलांचा दर्जा हा पुरुषाच्या बरोबरीने निर्माण करण्याचे पाऊल पुढे टाकले त्या काळी त्यांनां अनेक अडथळे आली त्यांनी पार करून आज महिलांना न्याय मिळताना दिसत आहे.तसेच कार्य अडीवासी समाजातील लोकांना देशात सर्व अधिकार इतर समाजाच्या बरोबरीत यायला मिळावे ह्या साठी काय करता येईल हे संविधानात लिहून ठेवले.तेव्हा कुठ आज आम्ही सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळून राहिला असे मत रंगराव काळे राज्य अध्यक्ष ह्यांनी अधिवेशनात मार्गदर्शन करतांना सांगितले.
    अधिवेशनाला चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बिरसा क्रांती दलाचे प्रेरणा गीत कामेश कोवे ह्यांच्या चमू ने गावून उपस्थित कार्यकर्त्याच्या मनात उत्साह निर्माण केला. वर्षभरात संघटनेचे काय करू राहिले पहीजे व त्याचे नियोजन कसे राहिले पाहिजे ह्या ह्या संदर्भात डी. बी. अंबूरे राज्य उपाध्यक्ष ह्यांनी मार्गदर्शन केले.मोठ्या संख्येने महिला सदस्य संघटनेच्या विचार धारेवर विश्वास ठेवून सक्रिय सभासद गीता आत्राम, निशा मडावी, पल्लवी मडावी, मनीषा मडावी, मनून नियुक्ती करण्यात आली.तालुक्याच्या पदाधिकारी ह्यांची फेरनिवड काही दिवसात करून समाजात निष्ठावान कार्यकर्ते निर्माण करू असे मत जितेश कुळमेथे बोलून दाखवले.अधिवेशन यशस्वी करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष अशोक उईके, महिला जिल्हा अध्यक्ष प्रीती मडावी, सुभाष शेडमाके जिल्हा उपाध्यक्ष, सुशील मडावी जिल्हा उपाध्यक्ष, अभिलाश परचाके जिल्हा युवा अध्यक्ष, आकाश गेडाम जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, राजेंद्र धूर्वे जिल्हा संघटक, मधुकर कोडापे जिल्हा कोष्याध्यश, पुरुषो्तम सोयाम जिल्हा उपाध्यक्ष, रेखा कुमरे जिल्हा महासचिव महिला, निर्मला मेश्राम, शारदा मेश्राम, लता पोरते , वैशाली मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष महिला, धनराज कोवे,भोलेनाथ कोवे शाशिभूषन कुलसंगे, विकास शेडमाके, पवन कोवे , वर्षा आत्राम, चंद्रकला मडावी, कांताताई मेश्राम, ललिता कोवे, उषा उईके,नीलिमा मेश्राम,ह्यांनी प्रयत्न केले. उमेश पेंडोर, ज्योस्ना कोडापे, शंकर चिक्राम,सचिन गेडाम,अरुण कुमरे, सुखदेव गेडाम, संगीता मेश्राम, सूरज कुमरे , साईनाथ कोडापे, बब्बलू कुळमेथें, मनीषा मडावी, ओंकार गेडाम,वंदना मडावी, तेजस्विनी सुरपाम, पायल कुल्संगे, अल्का पेंदाम, जयश्री मेश्राम, राकेश कोडापे,विनोद मडावी, सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र शेडमाके, ह्यांनी केले.


Post a Comment

0 Comments