मुंबई: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर 19 जानेवारीच्या पहाटे पाच वाजता सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात लहान मुल बचावला आहे. या मुलावर माणगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून उपचार सुरू करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार ट्रक आणि इको कारमध्ये हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की नऊ जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये 4 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात चार वर्षाचा लहान मूल बचावला आहे.
पाहाटे पाच वाजताच्या सुमारास ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या इको कारला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरील रहदारी विस्कळीत झाली आहे. ग्रस्त कार बाजूला करण्यात आले असून रहदारी हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
0 Comments