हाजीपूर: बिहार मधील हाजीपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.एका बोगस डॉक्टर दाम्पत्याकडे उपचारासाठी गेलेल्या महिलेचा गर्भपात झाला.या दरम्यान महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिचाही मृत्यू झाला.
या बोगस डॉक्टर पुरावे नष्ट करण्यासाठी भ्रुण कुत्र्यांना खायला घातला.कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.यानंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता ही खळबळजनक बाब उघडकीस आली.पोलीस तपासात सदर नर्सिंग होम देखील बेकायदेशीर असल्याचे उघड झाले आहे.तसेच या डॉक्टर दाम्पत्याकडे एमबीबीएस ची डिग्री नसल्याचेही उघड झाले आहे. घटनेनंतर डॉ. दाम्पत्य फरार झाले आहेत.
0 Comments