विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वरराव टेमुर्डे यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता त्यांचे पार्थिव शरीर मेडिकल कॉलेजला दान करण्याच्या निर्णय कुटुंबाने घेतला आहे. ‘माझ्या मृत्यूनंतर माझा देहाला अग्नी देवू नका,माझा देह मेडिकल कॉलेजला दान करा’,असा संकल्प मोरेश्वर टेंभुर्डे यांनी केला होता. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबाने हा निर्णय घेतला आहे.
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वरराव टेमुर्डे यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चंद्रपूर आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोरेश्वरराव टेमुर्डे यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. वरोरा- भद्रावती विधानसभेचे दोन वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. 81 व्या वर्षी त्यांनी अखेचा श्वास घेतला. निधनाची वार्ता कळताच राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मोरेश्वर टेमुर्डे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. एकनिष्ठ व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची ख्याती होती.
0 Comments