Ticker

6/recent/ticker-posts

पोंभुर्णा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज साजरा होणार पत्रकार दिन



प्रतिनिधी: मराठी पत्रकार सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरी केली जाते. राज्य सरकारच्या वतीने ही शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्याचे आयोजिले आहे. पत्रकार संघाच्या भावनात हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.





Post a Comment

0 Comments