Ticker

6/recent/ticker-posts

बेंबाळ येथे अग्नी तांडव, घर जळून लाखोचे नुकसान



विजय जाधव:मूल प्रतिनिधी


मूल तालुक्यातील बेंबाळ येथील अमोल मुरलीधर पगडपल्लिवार यांचे शॉर्टसर्किट मुळे घर जळाल्याची घटना आज बारा वाजताच्या दरम्यान घडली. वायरिंग शॉर्ट झाल्यामुळे ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले.

या घटनेत पगडपल्लिवार यांचे घरी असलेले टीव्ही, कुलर, बेड, कपाट, पैसे, कपडे, सोना संपूर्ण संपूर्ण घरगुती साहित्य जळून खाक झाले. घर मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अंदाजे चार लाखापर्यंतचे नुकसान झाल्याची माहिती आहे.


ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच घराशेजारी आणि गावातील नागरीकानी गर्दी केली आणि आग विझविण्यात यश आले. माञ तोपर्यंत अमोल मुरलीधर पगडपल्लिवार यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे पगडपल्लिवार यांनी गटातून काही पैसे घेतले होते, ते ही या आगीत जळून खाक झाल्याची माहिती आहे.




Post a Comment

0 Comments