Ticker

6/recent/ticker-posts

⭐गोसे खुर्द प्रकल्पाच्या कामाच्या कंत्राटदाराची दिरंगाई 💥नळ योजनेचे पाईप फोडले:नांदगाव येथील पाणीपुरवठा तीन दिवसापासून बंद 🌟उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याची समस्या




विजय जाधव मूल तालुका प्रतिनिधी 

     मुल तालुक्यातील नांदगाव येथील नळ योजनेचा पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसापासून बंद असल्यामुळे ग्रामीण जनतेला उन्हाळ्याची चाहूल लागताच पाहण्यासाठी वन वन करावे लागत आहे. विशेष म्हणजे गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे अंडरग्राउंड पाईपलाईनचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक ठिकाणी या कंत्राटदारांनी आपल्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास भोगाव लागत आहे. विविध ठिकाणी खोदकाम करून नळ योजनेचे पाईप लाईन फोडल्यामुळे नांदगाव आणि बेंबाळ समवेत नऊ गावांचा पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसापासून बंद आहे.
नवेगाव भुजला, बेंबाळ, नांदगाव, गोवर्धन, घोसरी, चेक दुगाळा, दुगाळा माल, कोरंबी, बाबराळा ही गावे एकाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळवत असल्याने या सर्व गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
पाईपलाईन दुरुस्त होताच वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर जळाला असल्याने तो दुसरा लावतो पर्यंत येथील पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे येथील सर्व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकावे लागणार आहे.
पाणीपुरवठा करणारी यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी पाणीपट्टी व गृहकर थकीत ठेवला नाही तर काम करणे लवकर सोपे होते असे मत नांदगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच सागर देऊळकर यांनी व्यक्त केले आहे.
       नांदगाव येथील ग्रामस्थांकडे गृहकर व पाणी करापोटी 18 लाख 35 हजार रुपये थकीत असल्याचे त्यांनी सांगितले.
      पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन संबंधित ग्रामपंचायतीने व अधिकाऱ्यांनी बिघड तात्काळ दुरुस्त करावा आणि ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी उपरोक्त सर्व ९ गावातील ग्रामवासीय नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments