पोंभुर्णा प्रतिनिधी
तालुक्यातील सर्व नदी नाले कोरडे पडल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे. तापमानात वाढ होत असल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठावरही होत आहे. नदी,नाले, तलाव, लहान बोळ्या कोरडे पडल्याने, मानवासह वन्य प्राण्यांची सुद्धा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे.
तालुक्यात वैनगंगा नदी वाहते परंतु फेब्रुवारी महिन्यातच नदी कोरडी पडल्याने नळ योजना वर परिणाम होऊन पाणी प्रश्न बिकट झाला आहे.
ही बाब जागरूक असलेले, जनतेच्या समस्या लक्षात घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत असणारे, जुनगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ पाल यांनी पालकमंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना संपर्क करून समस्या लक्षात आणून दिली. मंत्री महोदयांनीही तात्काळ समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. व दिनांक 28 फेब्रुवारी रोजी चीजडोह गॅरेज प्रकल्पाचे पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे सध्या पाणी प्रश्न मिटणार असल्याने राहुल भाऊ पाल तसेच मंत्री महोदय यांचे तालुक्यातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.
0 Comments