चंद्रपूर:- चंद्रपूरच्या राष्ट्रीय स्तरावरील हिंदी दैनिक डिजिटल व्हिडिओ न्यूज चॅनल (पार्थशर समाचार) च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूरच्या स्थानिक मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात रविवार, 12 मार्च रोजी चंद्रपूर गौरव व चंद्रपूर रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीपासून सुरू झालेल्या या पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क किंवा अनुदान घेतले जात नाही आणि विविध क्षेत्रांतून कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या चंद्रपूरच्या नागरिकांचा गौरव केला जातो. चंद्रपुरात जन्मलेले किंवा चंद्रपुरात राहणारे समाजसेवा, राजकारण, व्यवसाय, अध्यापन, महिला, विद्यार्थी, क्रीडा, पत्रकारिता, गायन, नृत्य, अभिनय, कला किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्य करणारे व्यक्ती स्वत:चे किंवा कोणत्याही ओळखीचे उमेदवारचे नामांकन दि. 8 मार्च (वाढीव मुद्दत) पर्यंत पाठवू शकतात. पुरस्कारामध्ये विजेत्याला ट्रॉफी, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन व त्यावर एक लघुपट तैयार करून दाखविला जातो. इच्छुक व्यक्ती पार्थशर न्यूजच्या वेबसाइटवर किंवा 866909 8703 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क करू शकतात.
या कार्यक्रम च्या अनुषंगाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रवक्ते आणि युवा प्रबोधनकार ऋषभ राऊत यांचे "पत्रकारितेची दशा आणि दिशा" या विषयावर व्याख्यान होणार आहे.
त्याचप्रमाणे चॅनल द्वारे या वर्षापासून प्रत्येक महिन्याला चॅनेलच्या सबस्क्राईबर्स साठी 1 वर्षाचा मोबाईल रिचार्ज, दुचाकी फुल टैंक पेट्रोल, पाच टी-शर्ट आणि दोघांसाठी डिनर असा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे, या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होणारे इच्छुकांना Parthashar samachar यु ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलवर विचारलेल्या सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन स्क्रीनशॉट पाठवायचा आहे.
0 Comments