कृषी उत्पन्न बाजार समितीचीच चौकशी करण्याची राहुल पाल यांची मागणी
तालुक्यात शेतकऱ्यांना लुटणारी बोगस व्यापाऱ्यांची टोळी सक्रिय असून "चोर तो चोर,वर शिरजोर" अशीच प्रचिती या तालुक्यात बघावयास मिळत आहे. आणि आश्चर्य म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती या सर्व प्रकारावर मौन बाळगून मूग गिळून बसून आंधळेपणाचा सोंग घेत आहे. त्यामुळे या समितीची सुद्धा वरिष्ठ पातळीवरील चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येईल असे जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
जूनगाव येथे यापूर्वी दोन व्यापाऱ्यांनी दोनदा एकाच कास्तकाराला वजन काट्याने लुटताना रंगेहात इलेक्ट्रॉनिक रिमोट असलेला यंत्र पकडला. इतकी मोठी चोरी होऊन सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती केवळ सेस फाडल्याच्या या नावाखाली थातूरमातूर चौकशी करून त्यांना सोडून देत असल्यामुळे यात कृषी उत्पन्न बाजार समितीचा तर हात नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. इतके प्रकरण झाले असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याऐवजी पाच पट सेस फाडून कारवाई केल्याचा बनाव दाखवत आहेत. याचा अर्थ थेट आर्थिक गैरव्यवहार करून तेरी भी चूप मेरी भी चुप असा प्रकार होत आहे.
काल दिनांक 16 मार्च रोजी दिघोरी,चकठानेवासना येथील प्रवीण बोंमकंठीवार या बोगस व्यापाऱ्याने नवेगाव मोरे येथील शेतकऱ्याचा माल खरेदी केला. या खरेदीत त्यांनी काट्यामध्ये अपरातफर केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांनाही रंगेहात पकडले. घाबरलेल्या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची माफी मागून एक लाखा चे प्रकरण चार लाखावर थांबविण्यात आले. यात या शेतकऱ्यांचा फायदा झाला असला तरी बोगसपणा किती आहे, लुटमार कशी सुरू आहे हे यावरून सिद्ध होते.
भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष व जुनगावचे उपसरपंच श्री राहुल भाऊ पाल यांनी थेट कृषी उत्पन्न बाजार समितीवर आरोप केला असून त्यांचीच चौकशी केल्यास मोठे प्रकरण समोर येईल, त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
0 Comments