Ticker

6/recent/ticker-posts

नांदगाव येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी



    ‌ मूल तालुक्यातील नांदगाव येथे विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. दुपारी तीन वाजता गावातील मुख्य चौकांमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तदनंतर सायंकाळी सहा वाजता पासून गावातील मुख्य चौकातून भव्य रॅली काढण्यात आली. भिमरायाच्या या रॅलीन अख्खी नांदगाव नगरी दुमदुमली. फटाक्यांच्या आतिशबाजीत, डीजेच्या तालावर अवघी तरुणाई थिरकली. मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नांदगाव नगरीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी परिसरातील अनुयायी फार मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाल्याचे दिसून आले. गावातील गणमान्य व्यक्ती, पदाधिकारी यांचा प्रामुख्याने समावेश होता. महिलांचा सुद्धा उदंड प्रतिसाद लाभला. बाबासाहेबांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. या रॅलीचा समारोप बुद्धविहाराजवळ करण्यात आला.
x
x

Post a Comment

0 Comments