अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभीड:____ भरधाव धावणाऱ्या एम.एच.46 ए.एच.6299 क्रमांकाच्या खाजगी ट्रॅव्हल्स ने रस्ता ओलांडणाऱ्या बालकाला दुपारी एक वाजताच्या दरम्यान धडक दिल्याने तो गंभीर रित्या जखमी झाला. सिद्धार्थ भास्कर शिंदेवय (11) वर्ष हा आपल्या मित्रासह नागरे ऑटोमोबाईल्स जवळ रस्ता ओलांडत असताना गडचिरोलीवरून नागपूर कडे जाणाऱ्या साई ट्रॅव्हल्स ने जोरदार धडक दिल्याने सिद्धार्थ गंभीररित्या जखमी झाला.. यात त्याच्या पायाला व छातीला मार लागला.. नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला तातडीने ब्रम्हपुरी येथे हलविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येथे पंचनामा करून ट्रॅव्हल्स व चालकाला ताब्यात घेतला आहे.. पुढील तपास ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात पो.ह.गायकवाड करीत आहेत.
नागभीड हे मध्यवर्ती ठिकाण असून 100 किमी वर नागपूर,80 किमी वर भंडारा,75 किमी गडचिरोली हे शहर असल्याने मोठ्या प्रमाणात खाजगी वाहतूक या शहरातून होत असते.. दररोज अवैध रित्या 100 पेक्षा जास्त हायवा ट्रक रेतीची वाहतूक करतात तर 150 पेक्षा जास्त ट्रॅक्टर अवैध मुरूमाची वाहतूक मात्र हे सगळे चोरीचे धंदे करताना या वाहनांचा वेग मर्यादेच्या पलीकडे असतो यामुळे अनेकदा छोटे मोठे अपघात होत असतात.. या अवैध गौन खनिजाच्या काळ्या धंद्यात अनेक राजकीय लोकांचे हात असून अधिकारी वर्गाशी संगनमत करून हे काळे धंदे राजरोस सुरु आहेत मात्र याचा त्रास नागभीड करांना सहन करावा लागत आहे..तसेच खाजगी ट्रॅव्हल्स चे चालक मालक सुद्धा मनमानी पणे वरच्या लेव्हल का 'आर्थिक' सेटिंग करून आपले धंदे आहेर आहेत. एखाद्या वेळेस थातूर मातुर कारवाही करून लागलीच वाहन व चालकाला सोडले जाते.. तसेच 18 वर्षाखालील मुलांचे व मुलींचे नागभीड शहारात गाड्या चालविण्याचे प्रमाण कारवाही होत नसल्याने दिवसागणिक वाढत जात आहे. नागभीड शहरात वर्दळीच्या ठिकानी खाजगी ट्रॅव्हल्स थांबत असून यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो आहे यामुळे नागभीड मधील सर्वसामन्य जनता व समाजिक संस्था मध्ये तीव्र नाराजी असून लवकरात लवकर प्रशासनाने या खाजगी वाहणावर योग्य ते निर्बंध घालून वाहतूक सुरळीत करण्यासाठी कारवाहीची मागणी करण्यात येत आहे.
0 Comments