Ticker

6/recent/ticker-posts

पोंभुर्णा बाजार समिती निवडणुकी च्या रणधुमाळीत काँग्रेस भाजपात रस्सीखेच ‌



पोंभुर्णा बाजार समिती निवडणुकी च्या रणधुमाळीत काँग्रेस भाजपात रस्सीखेच ‌

पोभुर्णा: येत्या 30 तारखेला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊ घातली असून या निवडणुकीत अनेक धुरंधर रिंगणात उतरलेले आहेत.दस्तूरखुद्द काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रविभाऊ मरपल्लीवार हे सुद्धा सेवा सहकारी सोसायटी गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झालेली आहे.भाजपानेही कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी कंबर कसलेली आहे. यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगणारअसल्याची चर्चा सुरू आहे.
      परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ श्रेष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते दुखावल्याचे चिन्ह दिसून येत आहे.एकंदरीत या तालुक्यात काँग्रेसमध्ये दुफळी माजली आहे.या तालुक्यातील बाजार समिती चे प्रथम सभापती तथा काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष ज्येष्ठ नेते कवळुजी कुंदावार यांचे सुपुत्र काँग्रेसचे युवा कार्यकर्ते प्रितिश कुंदावर यांनी बाजार समितीवर यावेळी काँग्रेसची सत्ता येणार नाही. अशी प्रतिक्रिया दिल्याने एकंदरीत काँग्रेसमध्ये उभी फूट दिसून येत आहे. विद्यमान तालुका अध्यक्ष रवींद्र मरपलीवार बाजार समिती कशा पद्धतीने आपल्या ताब्यात घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.
     कवडू जी कुंदावार सभापती आणि प्रशासक म्हणून बाजार समितीमध्ये काम करताना शासन स्तरावरून निधी प्राप्त करून बाजार समितीच्या विकासासाठी तत्कालीन पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या माध्यमातून अहोरात्र मेहनत घेतली. तालुक्याच्या विकासासाठी आणि काँग्रेसच्या विस्तारासाठी प्रयत्न केले. सद्यस्थितीत या बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने विद्यमान तालुका अध्यक्ष रविभाऊ मरपल्लीवार यांची कसोटी पणाला लागलेली आहे. एकीकडे भाजपाचे धुरंदर या निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याने पूर्वीप्रमाणे बाजार समितीचा काँग्रेसचा गड राखण्यात रवी भाऊंना कितपत यश मिळते याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेले आहे.

Post a Comment

0 Comments