मुंबईपासून जवळच असलेल्या मीरा रोड परिसर अत्यंत क्रुर घटनेने हादरला आहे. लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या महिला पार्टनरची निर्घृण हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 100 तुकडे करून ते प्रेशर कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातल्याचे उघडकीस आले आहे.
लिव्ह-इन-रिलेशनशिपमध राहणाऱ्या आपल्या 36 वर्षीय महिला पार्टनरची निर्घृण हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 100 तुकडे करून ते प्रेशर कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले. अंगाचा थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेने खळबळ उडाली आहे. मीरारोडच्या नयानगर परिसरत तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली, या घटनेने मिरा रोड पोलिस देखील चक्रावून गेले आहेत.
सरस्वती वैद्य (वय-36) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून मनोज साहानी (वय-56) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नयानगर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दोन-तीन दिवसांपूर्वी घडली आहे. 56 वर्षीय मारेकऱ्याने लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या केली. कटर मशीनने मृतदेहाचे तब्बल 100 तुकडे केले. एवढं करून नराधम थांबला नाही. आरोपीने महिलेच्या शरीराचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले. नंतर शिजवलेले तुकडे कुत्र्यांना खाऊ घालते.
काय आहे प्रकरण?
मिरा भाईंदर फ्लायओव्हरच्या शेजारी असलेल्या गीता- आकाशदीप बिल्डिंगमध्ये ही घटना घडली आहे. गीता नगर फेज-7, जे विंग फ्लॅट क्रमांक 704 मध्ये मनोज साहानी आणि सरस्वती वैद्य हे गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहात होते. मात्र, सरस्वतीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर सुरू आहे, असा संशय मनोजला होता. यावरून गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. मनोज हा सरस्वतीला बेदम मारहाणही करत होता. अशातच सरस्वतीने विष घेऊन आत्महत्या केली. सरस्वतीने आत्महत्या केली, या प्रकरणी पोलिस आपल्याला दोषी ठरवतील, या भीतीपोटी मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, असे आरोपीने पोलिसांना माहिती दिली.
अशी उजेडात आली घटना...
गीता- आकाशदीप बिल्डिंगमध्ये राहाणाऱ्या इतर रहिवाशांनी मनोज आणि सरस्वती राहात असलेल्या फ्लॅटमधून दुर्गंध येत असल्याचे सांगितले. याबाबत नया नगर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घरात प्रवेश केला असता ही धक्कादायक घटना उजेडात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मनोजने हत्येसाठी वापरण्यात आलेले घरातील सर्व साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
0 Comments