Ticker

6/recent/ticker-posts

एकाच दिवशी एकाच गावात एकाच आडनावाच्या निघाल्या दोन प्रेतयात्रा



जुनगाव: मृत्यू हे अटळ सत्य आहे, ते आज पर्यंत कोणालाही चुकवता आलं नाही. जन्माला येणारा प्रत्येक जीव हा शेवटी मृत्यूला कवटाळतो.

तालुक्यातील जुनगाव येथे दुर्दैवाने एकाच दिवशी एकाच आडनावाच्या दोन प्रेत पहावयास मिळाल्या.हा योग पहायला मिळाला. एकाच आडनावाच्या दोन व्यक्तींचे निधन झाले. 
एक महिला तर दुसरा पुरुष. तरुणविवाहिता प्रसूती दरम्यान नागपूर येथे मृत्यू झाल्याने तिला जुनगाव येथे सकाळी दहा वाजता आणण्यात आले. दरम्यान काल दुपारी दोनच्या सुमारास कवळूजी झबाडे यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. प्रभाकर दोडकु झबाळे यांची सून तरुण वयात मृत्यू पावल्याने गावात शोकाचे वातावरण पहावयास मिळाले. दोघांचेही आडनाव एकच आणि मृत्यूची प्रेतयात्रा एकाच दिवशी मागेपुढे असा हा दुर्दैवी योग जुनगाव येथे पहावयास मिळाला.

हा प्रसंग पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.

Post a Comment

0 Comments