विजय जाधव तालुका प्रतिनिधी
आज रोज सोमवारला दुपारच्या सुमारास वादळ वारा येऊन मेघांचा गडगडाट सुरू झाला. पाऊस व विजांचा कडकडाट पाहून चांदापूर येथील काही युवकांनी झाडाचा आसरा घेतला.
याच दरम्यान आकाशात जोरदार विज कडाडली आणि क्षणार्धात झाडावर कोसळली. या घटनेत विजय लाटेलवार वय 35 वर्ष या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. तर दोघांना किरकोळ मार लागला आहे.जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबाला शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी यांनी केली आहे.
0 Comments